हिंदी हास्य कविसंमेलनात हास्याचे फवारे

पुणे : पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या हिंदी हास्य कवी संमेलनामध्ये हास्याचे फवारे आणि टाळ्यांचा कडकडाट अनुभवायला मिळाला. शाब्दिक कोट्या आणि विनोदी रचना सादर करत या कवी संमेलनामध्ये सहभागी झालेल्या कवींनी रसिकांना चिंब केले.

३४ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत हिंदी विनोदी काव्य संमेलन बालगंधर्व रंगमंदिरात शनिवारी आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये सुभाष काबरा, आशकरण अटल, डॉ. मुकेश गौतम, महेश दुबे, राजेंद्र मालविय, सुमिता केशवा या कवींनी दैनंदिन जीवनातील किस्से, त्यावर रचलेल्या रचना, पती आणि पत्नीमधील संबंधांवर केलेल्या कोट्या, विनोद आणि सादर केलेल्या रचना यांनी रसिकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत दाद दिली.

मुकेश गौतम यांनी सादर केलेल्या रचना –

गुजर रही थी जिंदगी ऐसे मुकाम से
अपने ही दूर भागते थे जरासे जुखाम से..
क्या बताएं दर्द ए दिल, किस हाल में हम जी रहे थे
गिलास था रेड लेबल का और हम हल्दी पी रहे थे….

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद यांनी याचे संयोजन केले होते. महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी आणि महाराष्ट्रीयन उत्तर भारतीय एकता मंचचे सदस्य मुबेम संस्था यांचा सहयोग यास लाभला. या रचनेला रसिकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. त्यांनी सादर केलेल्या लग्नानंतर पत्नीला वैतागल्यानंतर ‘फिमेल’ या शब्दाचा तिटकारा आल्यानंतर बोलतानाही एखादा स्त्रीलिंगी शब्द आला तरी त्याचा उच्चार ते पुरुषार्थी कसा करतात आणि त्यातून निर्माण होणारे विनोद यांच्या रचनांना रसिकांनी भरभरून दाद दिली.

पुणे शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा पूजा आनंद यांनी प्रास्ताविक केले, तर संगीता तिवारी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Dnyaneshwar: