आर्थिक परिस्थिती निर्माण झाली की माणूस हतबल होतो. परंतु जर त्याच काळात त्याला उदरनिर्वाहासाठी काही आधार मिळाला की, पुन्हा नव्याने सुरुवात करतो.अशी आर्थिक परिस्थिती कोरोनाच्या काळात अनेक कुटूंबावर आली. परंतु म्हणतात ना चांगले कर्म केले की फळ नक्कीच मिळतं. आपल्याला आजूबाजूला असे काही मदतीचे हात असतात जे निस्वार्थीपणे मदत करतात. असंच 1965 साली स्थापन झालेलं पुण्यातील शुक्रवार पेठ भागात असणार ‘सेवा मित्र मंडळ ट्रस्ट’ हे आहे. अनेक वर्षाची सेवाभावी मंडळ म्हणून ओळखले जाते.वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून हे मंडळ सामाजिक,कुटुंबिक नातं जपत मदत करत असते.
सेवा परमो धर्म हे ब्रीदवाक्य घेऊन गेले अनेक वर्षे हे मंडळ काम करत आहे. यामध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदायाला मदत करणे,देवदासी स्त्रींना आधार देणे,शेकऱ्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्यांना पाठबळ देने, लोककलावंत ना आर्थिक मदत करणे,तर पुण्यातील आश्रम शाळेत असणाऱ्या मुलांना खाऊ देने असे वेगवेगळे उपक्रम सेवा मित्र मंडळ राबवत असतात. महाराष्ट्रत वारकरी संप्रदाय जास्त आहे. विशेष म्हणजे पंढरपूरला पुण्यातून पायी वारी प्रत्येक वर्षी जाते. या वारकरी बांधवाना पुण्यातील हे मंडळ अन्नदान या उपक्रमातून सेवा पुरवत असतात. तसेच पुण्यातील बुधवार पेठेमधील देवदासी स्त्रींना देखील जेवण वाटप करणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करून त्याना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात.
गेल्या दोन वर्ष्यात शेतकरी आणि व्यावसायिकाना कोरोनामुळे सगळ्यात जास्त फटका बसला यामुळे सेवा मित्र मंडळाने ‘घेऊ भरारी’ हा उपक्रम चालू करून शेकऱ्यासाठी आणि व्यवसायिकांसाठी चर्चासत्र घेऊन पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात केले. तसेच पुण्यात अनेक मूल स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात यामुलांना सकस आणि पौष्टीक जेवण मिळावे यासाठी कोरोना पासून अन्नकोट सुरू केले आहे. अश्या वेगवेगळ्या उपक्रमातून माणुसकीची नाळ आजून भक्कम करणारे सेवा मित्र मंडळ हे आहे.