जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असण्यार्या खंडोबादेवाच्या जेजुरीनगरीशेजारून वाहणार्या नाझरे धरणालगत कर्हा नदीवर कचर्याचे साम्राज्य निर्माण होऊन नदीचे प्रदूषण झाले आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने यातून शहराला दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होऊ लागल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यातून एकमेव कर्हा नदी वाहते. कर्हा नदी व त्यावर बांधलेले नाझरे धरण हे पूर्व पुरंदरला वरदान ठरले आहे. पुरंदर तालुक्यात सरासरी ४९६ मिलिमीटर पाऊस पडतो. त्यामुळे या अल्प पावसाने कर्हा नदी केवळ पावसाळ्यातच वाहते, त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरत नाही. दरवर्षी मार्च महिन्यानंतर हे धरण कोरडे पडू लागते. यावर्षी धरण परिसरात केवळ ५०४ मिलिमीटर पाउस पडला. त्यामुळे नाझरे धरण पूर्ण क्षमतेने भरू शकले नाही, सध्या धरणात केवळ उपयुक्त साठ्याच्या केवळ तीन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मृतसाठा २०० दशलक्ष घनफूट असून त्यात गाळाचे प्रमाण अधिक आहे. या मृतसाठ्यातून आणखी एक महिना पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे.
पाण्यात बुडून मृत्यूचे प्रमाण कमी…
कर्हानदीवरील नाझरे धरणात दरवर्षी हजारो भाविक देवकार्यासाठी येत असतात. अनेकदा अंघोळीला नदीत उतरलेल्या भाविकांचा पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे; गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी दुष्काळात या नदीतील खड्डे बुजविल्याने पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण शून्यावर आले आहे. ही समाधानाची बाब आहे. देवकार्याच्यानिमित्ताने कर्हा नदीवर अनेक छोटे व्यावसायिक असून हे व्यावसायिक नदीवर अंघोळ करण्यासाठी भाविकांना मज्जाव करीत असतात. त्यामुळे ही पाण्यात बुडून मृत्यूचे प्रमाण थांबले आहे.
जेजुरी महाराष्ट्राचे कुलदैवत असण्यार्या खंडोबादेवाच्या जेजुरीनगरीशेजारून वाहणार्या नाझरे धरणालगत कर्हा नदीवर कचर्याचे साम्राज्य निर्माण होऊन नदीचे प्रदूषण झाले आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने यातून शहराला दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होऊ लागल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.जुरी हे तीर्थक्षेत्र असल्याने देवकार्यासाठी दररोज हजारो भाविक कर्हा नदीवर (नाझरे धरणाच्या काठावर) येत असतात. येथे अंघोळ, गाड्या धुणे, निर्माल्य टाकणे, तसेच प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, कपडे, देवाचे जीर्ण झालेले फोटो, टाक, नारळ आदी पदार्थ नदीला सोडत असतात. त्यामुळे या नदीच्या काठावर कचर्याचे साम्राज्य निर्माण होऊन पाण्याचे प्रदूषण झाले आहे. पाणीसाठा कमी झाल्याने या कचर्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. हेच पाणी पुरंदर व बारामती तालुक्यातील ५६ गावांना पिण्यासाठी पुरवले जाते. त्यामुळे नळातून दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कुलदैवत खंडोबादेवाच्या दर्शनसाठी येणार्या भाविकांना देवकार्य करण्यासाठी कर्हा नदीवर घाट नसल्याने बहुतांशी भाविक नाझरे धरण परिसरात येऊन देवकार्य करीत असतात, त्यामुळे वर्षभर नदीत कचरा टाकल्याने पाणी दूषित
होत असते.