Gautam Gambhir On Shahid Afridi : लेजंड लीग क्रिकेटचा तिसरा हंगाम आजपासून (दि. 10) दोहा येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू होत आहे. यातील पहिलाच सामना हा धमाका करणारा ठरणार आहे. कारण इंडिया महाराजा आणि आशिया लायन्स यांच्यातील सामन्यानेच या स्पर्धेचा नारळ फुटणार आहे.
आजच्या सामन्यात गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी हे देखील एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमींच्या जुन्या आठवणी ताज्या होणार हे मात्र नक्की. लेजंड लीग क्रिकेट (LLC) चा तिसरा हंगाम आजपासून (दि 10) सुरू होत आहे. यातील पहिला इंडिया महाराजा आणि आशिया लायन्स यांच्यातील पहिला सामना हा भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होणार आहे.
या स्पर्धेत जागतिक क्रिकेटमधील रथी महारथी भाग घेणार आहेत. यामध्ये इंडिया महाराजा, आशिया लायन्स आणि वर्ल्ड जायंट्स असे तीन संघ सहभागी होतात. इंडिया महाराजाचा कर्णधार हा गौतम गंभीर आहे तर आशिया लायन्सचा कर्णधार शाहिद आफ्रिदी आहे. वर्ल्ड जायंट्सच्या नेतृत्वाची धुरा ही एरॉन फिंचवर आहे.