हौसेला मोल नसतं! बैलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन

सातारा | काही दिवसांपूर्वी मुलाच्या पाचव्या वाढदिवसाला खोडेवाडी येथे एका बापानं गौतमीचा कार्यक्रम आयोजित केलं होत. गौतमीनं त्या चिमुकल्याच्या वाढदिवसाला हजेरी लावत कार्यक्रम सादर केला. या वाढदिवसाची चर्चा महाराष्ट्रभर रंगली होती. महाराष्ट्रातील अनेक शुभ प्रसंगी गौतमीच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय. लहान मुलाचा वाढदिवस असो, घराची पूजा असो किंवा मग दुकानाचं उद्घाटन असो, गौतमीला बोलवलंच जात. गौतमी सध्या चांगलीच जोमात आहे आणि आता साताऱ्यात एका खास वाढदिवसानिमित्त गौतमीचा कार्यक्रम होतोय.

साताऱ्यातील एका बैलगाडा मालक आणि पैलवान असलेल्या सतीश भोसले यांनी आपल्या बैलाच्या वाढदिवसाला गौतमीच्या कार्यक्रमाचा आयोजन केलंय. साताऱ्यातील जावली येथील खर्शी गावात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. बैलाच्या वाढदिवसाला संध्याकाळी 7 वाजता गौतमी तिथे उपस्थित राहणार आहे. सातारकरांना पुन्हा एकदा गौतमीचा जलवा पाहायला मिळणार आहे. आपल्या बैलाच्या वाढदिवसाला गौतमीचा डान्स आयोजित करणारा पैलवान सतीश भोसले यांचा बैल हा महाराष्ट्र चॅम्पियन आहे. त्याच्यासाठी त्याचा बैल खूप खास असून त्याच्याच वाढदिवसाला त्यानं गौतमीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

Dnyaneshwar: