अन् गौतमी पाटील भावुक! म्हणाली, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाटलं सगळं संपलं, आता…;

मुंबई : (Gautami Patil On Viral Video) कार्यक्रमाच्या बॅकस्टेजच्या ठिकाणचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मला वाटलं आता सगळं संपलं… आता थांबावं, लोकांना आपली प्रगती बघवत नाही म्हणून मग ते या पातळीपर्यंत जातात याचा धक्का बसला अशी प्रतिक्रिया गौतमी पाटीलने ( Gautami Patil ) दिली. पण नंतर प्रेक्षकांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर पुन्हा उभी राहिली, महिला वर्गानेही सपोर्ट केला त्या सर्वांचे आभार मानते असं ती म्हणाली. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात गौतमी पाटीलने तिच्याशी संबंधित अनेक गोष्टींवर उत्तरं दिली.

एका कार्यक्रमाच्या ठिकाणी कपडे बदलताना गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावर बोलताना गौतमी पाटील म्हणाली की, माझा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मला वाटलं होतं की आता थांबावं. मला अक्षरशः धक्का बसला होता. त्यावेळी मी घरात होते आणि प्रचंड घाबरले होते. त्यावेळी मी एकच विचार केला, सगळं संपलंय, आता थांबायचं.

लोकांना आपली प्रगती बघवत नाही म्हणून लोक इथपर्यंत जातात का? पण मी थांबले तर त्यांच्या मनासारखं होणार, म्हणून मी नव्याने सुरूवात केली. समोरून मला रिस्पॉन्स कसा येईल, लोक काय बोलतील याची भीती वाटत होती. पण लोकांचे आभार, त्यांनी मला सांभाळून घेतलं. प्रेक्षकांनी साथ दिली नसती तर उभी राहू शकली नसते, महिला वर्गानेही सपोर्ट केला.

Prakash Harale: