मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) असा सामनाही बुधवारी पाहायला मिळाला. या घडामोडींमुळे (Maharashtra Political Crisis) अनेक राजकीय नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले. सगळीकडे अस्वस्थता पाहायला मिळत आहे. याच राजकीय घडामोडींचा परिणाम नृत्यांगणा गौतमी पाटीलवर (Gautami Patil) झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गौतमीच्या ‘घुंगरू’ (Ghungroo) या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमाच्या माध्यमातून नृत्यांगणा गौतमी अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. पण आता तिच्या पहिल्या-वहिल्या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा परिणाम गौतमी पाटीलवर
महाराष्ट्रातील चालू राजकीय घडामोडींचा परिणाम गौतमी पाटीलच्या आगामी ‘घुंगरू’ या सिनेमावर झालेला दिसत आहे. गौतमीची मुख्य भूमिका असलेल्या ‘घुंगरू’ या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्रात होत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
पुढील आठ दिवसांत ‘घुंगरू’ची रिलीज डेट जाहीर होणार
‘घुंगरू’ या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन बाबा गायकवाड यांनी केलं आहे. त्यामुळे रिलीज डेट पुढे ढकलण्याबाबत बाबा गायकवाड म्हणाले,”काही कारणाने ‘घुंगरू’ या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील आठ दिवसांत ‘घुंगरू’ सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येईल”. गौतमीच्या ‘घुंगरू’ या सिनेमाची घोषणा झाल्यापासून ते प्रतीक्षा करत आहेत.