सर्वसामान्यांचे मार्गदर्शक; शेतकर्‍यांचे नेते शरद पवार

लहानांपासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वश्रुत असलेले शरद पवार हे माझे राजकारणातील आदर्श आहेत. महाराष्ट्रासोबत पश्चिम महाराष्ट्राचा खर्‍या अर्थाने जर कोणी विकास केला असेल तर पवार हे नाव आवर्जून घ्यावे लागते. प. महाराष्ट्रातील शेतकरी यामुळेच स्वयंपूर्ण आहेत. ते देशाच्या राजकारणात खूप महान नेते म्हणून ओळखले जातात. पवारांना महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता साहेब या नावाने ओळखते. तसेच पवार यांना शेतकर्‍यांचे नेते म्हणून देखील ओळखले जाते.

महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी धडपडणारे व महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा विकास साधणारे पवार साहेब यांचे कर्तृत्व खरंच महान आहे. बारामतीच्या खाणीतून शरद पवारांसारख्या हिर्‍याला शोधून काढण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केले. म्हणून पवार यांच्यासारखे नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला लाभले. आपल्या असामान्य व्यक्तिमत्त्वाने देखील पवार साहेब यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःचे आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. पवार हे आपल्या देशातील महान नेते आहेत. शरद पवार यांचे वय हे ८० वर्षापेक्षा जास्त झाले असले, तरीदेखील राजकारणाला नवी दिशा देण्याचे काम ते करीत आहेत.

पवार हे केवळ राजकारणाशी संबंधित नसून, ते एक महान अभ्यासू, व्यासंगी नेते आहेत. साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान व तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी आपले कर्तृत्व दाखवले आहे. पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याबरोबर देशाचे कृषिमंत्री होण्याचादेखील मान मिळविला आहे. केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांनी भारतातील शेतकर्‍यांना आत्मनिर्भर बनवण्याकरता प्रयत्न केले. शेतकर्‍यांचे उत्पादन वाढावे व त्यांनी उत्पादनक्षम व्हावे याकरिता त्यांनी अनेक सुधारणा केल्या. त्यासोबतच क्रीडा क्षेत्रामध्ये देखील शरद पवार यांचे कर्तृत्व असामान्य आहे. २०१९ च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या वेळी पावसातील सभेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नावाजलेले नेते म्हणून पवार यांना संपूर्ण देशभरामध्ये ओळखण्यात आले होते.

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षांची आघाडी करून सरकार स्थापन करण्यामागे पवार यांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. संपूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्याला विकसित करण्यामध्ये व महाराष्ट्राला एक वेगळे स्थान निर्माण करून देण्यामध्ये पवार यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. आजदेखील ते महाविकास आघाडीचे मार्गदर्शक बनून खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.

Dnyaneshwar: