मुलाची हत्या की आत्महत्या? गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टोकाची टीका!

जळगाव : (Girish Mahajan On Eknath Khadse) मंत्री गिरीश महाजन यांनी टीकेची पातळी ओलांडत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूची आठवण करून देत निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे यांच्या मुलाची हत्या की आत्महत्या? असा सवाल महाजन यांनी विचारला आहे.

दरम्यान यावेळी महाजन म्हणाले, मुलगा नसणं हे काही दुर्दैव नाही, मुली असणं देखील सुदैवच आहे. मी खूप आनंदी आहे. माझा त्यांना प्रश्न आहे की, त्यांना एक मुलगा होता त्याचं काय झालं? याचं उत्तर त्यांनी द्यावं. मला हा विषय बोलायचं नाहीये पण, ते जर मझ्या मुलाबाळांबद्दल बोलत असतील तर खडसेंना एक मुलगा होता. ३२-३३ व्या वर्षी त्याचं काय झालं? हा संशोधनाचा विषय आहे? हे बोलणं त्यांना झोंबेल, मुलगा असून आपल्या मुलाचं काय झालं. आत्महत्या झाली की त्याचा खून झाला? हे तपासण्याची गरज आहे, असे महाजन म्हणाले आहेत.

या प्रकरणावर बोलताना खडसे म्हणाले की, गिरीश महाजन तणावाखाली आहेत, त्यांना काय बोलावं सुचत नाहीये. असं नीच राजकारण मी कधी आयुष्यात केलं नाही. यांचे अनेक उद्योग मला माहिती आहेत असे खडसे म्हणाले. माझ्या मुलाचा खून झाला की आत्महत्या याबद्दल बोलायचे झाले तर केंद्रामध्ये यांचं सरकार आहे, त्यांना अशी शंका असेल तर चौकशी करायला माझी हरकत नाही. त्यावेळेस मी घरी नव्हतो, त्यासंदर्भात सीबीआय वगैरे आणखी यंत्रणांनी चौकशी करावी असेही खडसे म्हणाले.

Prakash Harale: