जळगाव | Girish Mahajan On Eknath Khadse – राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी निशाणा साधला आहे. एकनाथराव खडसेंचे कारनामे लवकरच बाहेर येतील, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ खडसे यांनी अनेक कारनामे केले आहेत. त्यांनी आपल्यावर खोटा गुन्हाही दाखल केला आहे, असे अनेक कारनामे लवकरच बाहेर येतील. त्यांनी कायद्याचा एवढा खोटा आधार घेतला आहे. आता आमची वेळ आली आहे. त्यांनी कायद्याला सामोरं जावं. जिल्हा दूध संघाचीही चौकशी सुरू आहे. त्यांनी पाच वर्षांत तेथे काय केलं, काय नाय केलं हेही जनतेसमोर लवकरच येईल. आम्ही त्यांच्यासारखा एकही खोटा गुन्हा दाखल करणार नाही.
जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीबाबतही गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना आव्हान दिलं. खडसे आमच्या उमेदवारांवर आक्षेप घेत आहेत. ते म्हणतील तो उमेदवार आपण त्यांच्याविरोधात देऊ. त्यांनी निवडून येऊन दाखवावं, असं आव्हानही महाजनांनी खडसेंना दिलं आहे.