“आता शिवसेना भवनासाठी मारामाऱ्या…”, गिरीश महाजनांचं खळबळजनक वक्तव्य

जळगाव | Girish Mahajan On Shivsena – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गट (Shinde Group) असा सामना पाहायला मिळत आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह काही आमदार, खासदार आणि नगरसेवकांनी बंड करत आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. पक्षातील गटनेतेपदासोबतच, पक्ष, पक्षाच्या चिन्हावरही शिंदे गटानं दावा केला आहे. या संघर्षासंदर्भातील प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान, यासंदर्भात आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. त्यांनी जळगावात एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी गिरीश महाजन म्हणाले, “अडीच वर्षांचा आमचा काळ फुकट गेला. आमच्या पाठित शिवसेनेनं खंजीर खुपसला. आमच्याशी गद्दारी करून राष्ट्रवादी, काँग्रेसला जाऊन मिळाले. मात्र याचं फळ शिवसेनेला मिळालं आहे. त्यांचे 50 पैकी चाळीस आमदार गेले, 18 पैकी 12 खासदार गेले. आता त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलेलं नाही. आता नावासाठी, चिन्हासाठी भांडत आहेत, परवा मैदानासाठी भांडत होते, आता काही दिवसांनी शिवसेना भवनासाठी मारामाऱ्या होतील, अशी टीका गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

पुढे ते म्हणाले, लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाणचा अनुभव हागणदारी वरून मला आला असून या विषयावर आपली मोठी कोंडी झाल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे. तसंच मी ग्रामविकास मंत्री आहे. राज्याती मी सगळीकडे हागणदारी मुक्तीबद्दल लोकांना हगणदारीमुक्त गावं करा, रस्त्यावर कुणीही शौचास बसू नका, याबाबत सांगत असतो आणि माझ्याच तालुक्यात केकतनिंभोरा या गावात रस्त्यालगत एक, दोन नव्हे 50 लोक रस्त्यालगत बसलेले दिसले.”, असंही गिरीश महाजन यांनी सांगितलं. 

मी राज्यात लोकांना कोणत्या तोंडानं सांगायचं म्हणत गिरीश महाजन यांनी आपल्या डोक्याला हात मारून घेतला. यावेळी सभेत उपस्थितांना हसू अनावर झालं. माझ्या तालुक्यातच जर अशी परिस्थती आहे, तर मी इतरांना काय सांगेन, म्हणून माझी हातू जोडून सर्वांना विनंती आहे, उघड्यावर शौचास बसू नका, हे थांबविण्यासाठी यापुढे मी गांधीगिरी करणार असून रस्त्यावर बसणाऱ्या लोकांना गुलाबपुष्प देणार आहे. स्वच्छतेसाठी सर्वांनी पुढाकार  घेतला पाहिजे, असं आवाहन देखील यावेळी गिरीश महाजन यांनी केलं.

Sumitra nalawade: