“पत्रकार मुली साड्या का नाही नेसत? शर्ट, ट्राऊझर…”; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

पुणे (Supriya Sule Controvercial Statement On Saree) : काहीच दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide Sambhaji Brigade) यांनी एका महिला पत्रकाराला ‘तू आधी टिकली लाव नंतर तुला बोलेन’ असं वक्तव्यं केलं होतं. त्यावेळी ते नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मंत्रालयात भेटून खाली आले होते. त्यांच्या वक्तव्यावरून राज्यभरात भिडे यांना धारेवर धरण्यात आले होते. महिलांच्या स्वातंत्र्याबद्दल मोठ्या प्रतिक्रिया राज्यातील विरोधी पक्षातीलं नेत्यांकडून दिल्या जात होत्या. दरम्यान, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule NCP) यांनी देखील संभाजी भिडे यांच्यावर टीका केली होती. मात्र, आता सुप्रिया सुळे या त्यांच्याच एका वक्तव्याने त्या चर्चेत आल्या आहेत. भाजपच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. (Supriya Sule Controvercial Statement On Saree)

एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या, की “चॅनेल मधल्या मुली साडी का हो नाही नेसत? ते शर्ट आणि ट्राऊझर का घालतात? प्रत्येक बाबतीत पाश्चिमात्यकरण आपण करतोय. फक्त दिवाळी वगैरे असली की सगळे तयार होऊन येतात. फक्त आत्मनिर्भर भारत, मग चॅनेलवर आत्मनिर्भर महाराष्ट्र का नाही दाखवत? मग एवढे सगळे मराठी संस्कृतीचे नियम – कायदे फक्त आम्हालाच का, तुम्हाला नाही? साध्या लहान गोष्टींपासून सुरुवात करा.” असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून चित्रा वाघ यांनी ट्विट करून सुळेंवर टीका केली आहे.

‘टिकली’वर टीका करणारे ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का..? चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या !’ अशी टीका सुप्रिया सुळे यांच्यावर चित्रा वाघ यांनी केली आहे.

संभाजी भिडे यांच्या टिकलीवरील वक्तव्यावरून सुप्रिया सुळे यांनी खालील कवितेच्या माध्यमातून निषेध केला होता.

तू आणि मी ….
मी लावतो टिळा
तू लाव टिकली
परंपरेच्या बाजारात
अक्कल आम्ही विकली

मी लावतो भस्म
तू लाव कुंकू
गुलामीचा शंख
दोघे मिळून फुंकू

तू घाल मंगळसूत्र
मी घालतो माळ
मनूने मारलेली रेषा
मनोभावे पाळ

तू घाल बांगड्या
माझ्या हातात गंडा
मुकाट्याने ऐक नाहीतर
आमच्या हातात दंडा

मी घालतो मोजडी
तू जोडवे घाल
सप्तपदी च्या मर्यादेत
जन्मभर चाल

तू घाल अंबाडा
मी शेंडी राखतो
विज्ञानाच्या प्रगतीला
परंपरेने झाकतो

मी घालतो टोपी
तू घाल बुरखा
बायकांच्या गुलामीवर दोन्हीकडे
एकमत आहे बर का

मी धोतरात, तू शालूत
होऊ परंपरेचे दास
साने गुरुजी ते भिडे गुरुजी
महाराष्ट्राचा प्रवास
– हेरंब कुलकर्णी

Dnyaneshwar: