माझ्या मताचा अधिकारच संजय राऊतांनाच द्या; ‘या’ आमदाराचं मोठं विधान!

मुंबई : (Devendra Bhuyar On Statement Vidhanparishad Election 2022) राज्यसभा निवडणुकीत झालेला पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या निवडणूकीत सेनेचे उमेदवार संजय पवार यांचा आवघ्या काही मतांनी निसटता पराभव झाला. संजय राऊत यांनी या पराभवाचं खापर अपक्ष आमदारांवर फोडत आगपाखड केली. त्यावेळी त्यांना मविआ समर्थक मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांचं नाव घेतलं होतं. यावरुन बराच गदारोळ पहायला मिळाला. त्यानंतर आता विधान परिषदेतील माझ्या मतदानाचा अधिकार संजय राऊत यांनाच देऊन टाकावा. ते त्यांच्याच हाताने मतपेटीत मत टाकतील, असे विधान अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता विधानपरिषद निवडणुकीत आमदार भुयार यांनी एक अजब प्रस्ताव मांडला आहे. पुढे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, विधानपरिषद निवडणुकीत मविआचा उमेदवार पराभूत झाला तर, तो अपक्षांनीच पाडला असे संजय राऊत त्यादिवशी १०० टक्के म्हणतील हे कुठं तरी थांबलं पाहिजे असं भुयार म्हणाले.

या सर्व गोष्टीची जाणीव मला आहे. त्यामुळे मी एकचं ठरवलंय की, मी परवाच्या बैठकीत अशी भूमिका घेणार आहे की, माविआ’चा उमेदवार पडल्यास त्याचे खापर अपक्ष आमदारांवर फोडू नका? असे भुयार यांनी यावेळी सांगितलं आहे. त्यानुसार विधानपरिषद निवडणुकीसाठी मी मतदान करायला जाईन तेव्हा संजय राऊत यांना माझ्यासोबत पाठवावं. मी मतदान करताना संजय राऊत माझ्या टेबलाच्या समोर उभे राहतील. मी त्यांना मत दाखवून मतपेटीत टाकेन, असा प्रस्ताव देवेंद्र भुयार यांनी मांडला आहे. आता यावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात हे पाहाणं महात्वाचे ठरणार आहे.

Prakash Harale: