भोपाळ : उत्तर प्रदेशातील एका निवृत्त आयएएस आसणाऱ्या सासऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिलेने केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, माझ्या माहेरचे लोक माझ्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत आहेत. माझं दि. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी भोपाळमध्ये लग्न झालं. आणि लग्नाच्या दुसऱ्याचं दिवशी मला समजले की, माझा नवरा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सक्षम नाही. ही गोेष्ट सासरच्या लोकांनी आमच्यापासून लपवून ठेवली होती.
दरम्यान, या संदर्भात पिडीत महिलेनं भोपाळमध्ये आयजी, डीआयजी यांच्याकडे तक्रार केली आहे. यात तिनं म्हटलं आहे की, पतीचं नपुंसकतेचं सत्य समोर आल्यानंतर सासऱ्यानं माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे प्रयत्न केले. परंतू त्यास मी विरोध केल्यामुळं त्यांनी माझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. यात पतीनंही तिला साथ दिली नाही. या महिलेनं सासरच्या लोकांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोपही केला आहे.