मुंबई | Bipasha Basu And Karan Singh Grover Are Soon To Be Parents – बाॅलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण जोहर लवकरच आई-बाबा होणार आहेत. बिपाशा आणि करणच्या लग्नाला जवळपास सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. सहा वर्षानंतर दोघांच्या घरी पाळणा हलणार असल्याचं बोललं जातंय. तसंच बिपाशा आणि करण लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. पिंकविला वेबासाईटला एका सूत्राने माहिती दिली आहे की बिपाशा आणि करण खूपच आनंदात आहेत.
बिपाशा आणि करण एप्रिल 2016 साली विवाहबंधनात अडकले होते. कुटुंबिय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत अगदी खासगी पद्धतीने दोघांचा लग्न सोहळा पार पडला होता. लग्नानंतर अनेकदा बिपाशा गरोदर असल्याच्या अफवा उडाल्या होत्या. तसंच आता पिंकविलाच्या वृत्तानुसार, करण बिपाशा लवकरच आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना देणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सध्या दोघंही आयुष्याच्या आनंदी टप्प्यात असून आई वडिल बनण्यासाठी उत्सुक आहेत.
दरम्यान, ‘अलोन’ सिनेमाच्या वेळी बिपाशा आणि करणची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. करणचं बिपाशासोबतच हे तिसरं लग्न आहे. याआधी त्याने अभिनेत्री श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेटशी लग्न केलं होतं.