शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता ‘या’ दिवशी होणार जमा

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार पीएम किसान सम्मान निधीच्या संबंधित शेतकऱ्यांना २ हजार रुपयांचा हप्ता थेट त्यांच्या खात्यात जमा करत असते. मात्र त्याचे ११ व्या हप्त्याचे पैसे अजून जमा झाले नाहीत. केंद्र सरकार येत्या ३१ मे रोजी पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. अशी या संदर्भातील घोषणा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केली आहे. तब्बल १२ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

दरम्यान, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर मध्यप्रदेशमध्ये एका कृषी कार्यक्रमात ऑनलाईन उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सम्मान निधीची घोषणा केली. या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांचा निधी दिला जातो. या निधीचा ११ वा हप्ता ३१ मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पुढील काळात हे सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवणार आहे असे सांगितले.

Prakash Harale: