बळीराजासाठी आनंदाची बातमी; हवामान विभागानं वर्तवला ‘हा’ अंदाज

मुंबई | Mansoon In Kokan – राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मान्सून पुढच्या ४८ तासात कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. अखेर कोकणात अडखळलेली मान्सूनची गाडी कोकणात येणार आहे. दरम्यान, यंदा मान्सून लवकर येणाचा अंदाज वर्तवण्यात येत होता, मात्र, मान्सूनच्या आगमनासाठी थोडा उशीर झाल्याचं दिसत आहे.

कोकणात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्यानं ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. तसंच कोकणात मान्सून दाखल झाल्यानंतर पुढच्या ४ दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या अन्य भागात दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात मान्सूनचे नैऋत्य वारे पुढे सरकरतील असं सांगण्यात आलं आहे. पुढच्या ४८ तासात तळकोकणात मान्सून दाखल होणार आहे. तर काही ठिकाणी उष्णतेची लाट असल्याची स्थिती देखील आहे. पुढील चार दिवसात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

दरम्यान, राज्यातील काही भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हिंगोली, अमरावती, सातारा, नाशिकसह कोकणातील काही भागात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. तसंच सोलापूर जिल्ह्यातील काही भागात देखील पावसानं हजेरी लावली, नवी मुंबईतही सकाळापासून या पावसाला सुरुवात झाली आहे. 

Sumitra nalawade: