खुशखबर! स्वारगेट-कात्रज भुयारी मार्गाला राज्य सरकारची मान्यता

metro2222metro2222

पुणे : पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेचा विस्तार निगडी आणि कात्रजपर्यंत करण्याची मागणी गेल्या चार वर्षांपासून केली जात होती. तर पिंपरी ते निगडीचा प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहे. परंतु आता महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या प्रस्तावावर राज्य मंत्रिमंडळाने स्वारगेटपर्यंतच्या मेट्रो मार्गाचा कात्रजपर्यंत विस्तार करण्यासाठी मान्यता दिली आहे. तसेच या साडेपाच किमीच्या मार्गिकेसाठी तीन हजार ६६८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

याचप्रमाणे स्वारगेट ते कात्रज हा मार्ग भुयारी पद्धतीने करावा लागणार असल्यामुळे आर्थिक खर्च जास्त प्रमाणात येत असल्याने हा प्रस्ताव रखडला होता पण आता पुणे महापालिका आणि राज्य सरकार या दोघांनी केंद्रसरकारने कमी करून दिलेला आर्थिक भार भरून देणार असल्याची जबाबदारी स्वीकारली आहे यानंतर आता या मार्गाला मान्यता मिळाली . या मार्गावरील महत्वाची बिबवेवाडी, धनकवडी, बालाजीनगर, कात्रज, आंबेगाव हि ठिकाण असल्याने या भागात
जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते तर ती सुरळीत चालवीत हा यापाठीमागचा हेतू आहे.

तसेच या प्रकल्पासाठी लागणार एकूण खर्च तीन हजार कोटी रुपये आहे. त्यातील ८११ कोटी रुपये राज्यसरकार तर पुणे महापालिकेला ६५५ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत . यासाठी केंद्रसरकार कडून तीनशे कोटी रुपये अनुदान मिळण्यात यावे अशी विनंती केली जात असल्याचं नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहे. आता लवकरात लवकर या प्रस्ताव केंद्र सरकारने मान्यता दिल्यास पुढील काम लवकर सुरु होईल.

Nilam:
whatsapp
line