Google Doodle : पाणीपुरी, गोलगप्पा (Golgappa), पुचका (Puchka) अशा कितीतरी नावाने ओळखला जाणारा मात्र जिभेवर याची चव कायम राहणारा असा हा पदार्थ म्हणजे पाणीपुरी (Panipuri). याच पाणीपुरीची भुरळ आता गुगलला देखील पडली आहे. गुगलने एका खास संवादात्मक डूडल गेमच्या माध्यमातून पाणीपुरीची लोकप्रियता साजरी केली आहे.
गुगलनं पाणीपुरीची लोकप्रियता साजरी करण्यासाठी आजचा दिवस निवडण्यामागे देखील एक कारण आहे. 12 जुलै 2015 रोजी, मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील एका रेस्टॉरंटनं 51 पर्याय ऑफर करून सर्वाधिक फ्लेवर्सच्या पाणीपुरी सर्व्ह करण्याचा जागतिक विक्रम नोंदवला होता. आता आठ वर्षांनंतर गुगलनं या उल्लेखनीय विक्रमाची आठवण ताजी केली आहे. गुगलनं युजर्सना एक मजेशीर इंटरअॅक्टिव्ह पाणीपुरी गेम खेळण्याची संधी दिली आहे.