गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने 12 हजार कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

मुंबई | Google Layoffs 2023 : गुगलची (Google) पॅरेंट कंपनी (Parent Company) असलेल्या अल्फाबेट (Alphabet) कंपनीनं तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. याबाबतचं वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे. कर्मचाऱ्यांची नोकरी गेल्याबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं दिली आहे. तसंच गुगलनं (Google) जगभरातील सहा टक्के नोकरी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

नोकर कपातीचा परिणाम इतर सहकाऱ्यांवर होतो. ज्यामध्ये भरती, काॅर्पोरेट कामं, तसंच काही अभियांत्रिकी आणि उत्पादनावरही याचा परिणाम होतो. सध्या संपूर्ण जगभरात नोकरी कपात होत आहे. याचाच सर्वाधिक परिणाम यूएसमधील कर्मचाऱ्यांवर होतो, असं गुगलनं (Google) म्हटलं आहे.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी कर्मचाऱ्यांना ईमेलवरुन सांगितलं की, “आम्ही घेतलेल्या निर्णयांची संपूर्ण जबाबदारी घेत आहोत. कंपनीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी हा महत्वाचा क्षण आहे. हा निर्णय एकूण खर्चाचं नियोजन आणि पुढील तयारीसाठी घेतला आहे. तसंच नोकरीवरुन काढलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा नोटीस कालावधी असेल अथवा 60 दिवसांचा पगार दिला जाईल, असं पिचाई यांनी सांगितलं.

Sumitra nalawade: