“रोहित पवार हा बिनडोक माणूस…”, गोपीचंद पडळकरांची सडकून टीका

मुंबई | Gopichand Padalkar On Rohit Pawar – आजपासून (19 डिसेंबर) राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. तसंच आज राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विधानभवन परिसरात ‘संघर्ष’ नावाच्या पुस्तकाचं वाटप केलं. यावरून भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या रोहित पवारांना ‘संघर्ष’ शब्दाचा अर्थतरी कळतो आहे, असं पडळकर म्हणाले. त्यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, “रोहित पवार हा बिनडोक माणूस आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या रोहित पवार यांना संघर्ष शब्दाचा अर्थतरी कळतो आहे. असा कोणता संघर्ष रोहित पवारांनी केला आहे, की ते ‘संघर्ष’ नावाचं पुस्तक वाटत आहेत”, अशी टीका पडळकरांनी केली.

“आज हे लोकं शाहू-फुले-आंबेडकरांची पुस्तकं वाटत आहेत. मात्र, शाहू-फुले-आंबेडकरांचं नाव घेण्याची पात्रता पवार कुटुंबियांची नाही. ज्या पवारांनी (Sharad Pawar) चार वेळा राज्याचं मुख्यमंत्रीपद भोगलं, त्यानंतर त्यांचाच पुतण्या (Ajit Pawar) या राज्याचा उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री आणि अर्थमंत्री होतो. त्यांचीच मुलगी (Supriya Sule) परत खासदार होते, त्यांचाच नातू (Rohit Pawar) परत आमदार होतो, हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या कोणत्या पुस्तकात लिहिलं आहे?” असा सवालही पडळकरांनी उपस्थित केला.

पुढे त्यांनी सीमावादाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीवर टीका केली. “राष्ट्रवादी काँग्रेसकडे इतके वर्ष जलसंपदा विभाग होता. मात्र, ते जत सारख्या दुष्काळी भागाला साधं पाणी देखील देऊ शकले नाहीत. मग तुम्हाला सीमावादावर बोलायचा अधिकार तरी काय आहे?” असा प्रश्नही गोपीचंद पडळकरांनी विचारला.

Sumitra nalawade:

View Comments (0)