“राज्यातील बिंडोक नेते…”, गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर गंभीर टीका

मुंबई | Gopichand Padalkar On Jayant Patil – काही दिवसांपूर्वी भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारला सुनावलं होतं. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला हे दुर्दैवी आहे. आव्हाडांवर लावलेली कलमे चुकीची आहेत, असं जयंत पाटील म्हणाले होते. तसंच पोलिसांकडून कायद्याचा गैरवापर केला जात आहे. पोलीस बुद्धी गहाण ठेवून विरोधकांवर कारवाई करत आहेत. असाच गैरवापर होत राहिला तर सर्वसामान्यांचा पोलिसांवरील विश्वास उडेल, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. यावरून आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

“जयंत पाटील राज्यातील बिंडोक नेते आहेत. जयंत पाटील पालकमंत्री होते तेव्हा माझ्या भावाविरोधात हद्दपारीची नोटीस काढली. आमच्यावर अनेक गुन्हे दाखल केले, कार्यकर्त्यांना हद्दपार केलं. राज्यातील प्रत्येक नेता लोकांमध्ये असतो. एका नेत्याचा व्हिडीओ दाखवा ज्यानं असं महिलेला बाजूला केलं आहे. जितेंद्र आव्हाडांच्या वर्तवणुकीचं तुम्ही समर्थन करता”, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले, “जयंत पाटलांच्या वक्तव्याला काडीचीही किंमत नाही. आम्ही राजकारण करत नाही, पोलीस त्यांच्या पद्धतीनं काम करतात. महिलेनं तक्रार दिली आहे त्याचा पोलीस तपास करतील. त्यामुळे विरोधकांवर चुकीच्या पद्धतीनं कारवाई करण्याची गरज नाही”, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.

Sumitra nalawade: