“…तर शरदचा शमशुद्दीन झाला असता”; आव्हाडांच्या विधानावर टीका करत पडळकरांनी शरद पवारांवर निशाणा साधला

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचे वातावरण चांगलेच तापले आहे. आव्हाडांच्या या विधानांमुळे सामाजिक, राजकीय तसेच हिंदुत्वादी संघटना, भाजपा कार्यकर्ते यांच्याकडून निषेध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवरच आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जितेंद्र आव्हाडांच्या या विधानावर टीका करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.

“जितेंद्र आव्हाड हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदू देव, देवता यांच्याविषयी आक्षेपार्ह विधानं करत आहेत. कदाचित शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून हे सगळं बोलत असतील. असं मला वाटतं आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर जितेंद्रचा जितुद्दीन झाला असता, अजितचा (Ajit Pawar) अझरुद्दीन झाला असता, शरदचा शमशुद्दीन झाला असता, रोहितचा (Rohit Pawar) रज्जाक झाला असता. मतांसाठी किती खालच्या पातळीवर जावं, हे पवारांकडून कशापद्धतीने मतासाठी राजकारण केलं जातय हे महाराष्ट्रातील लोकांनी बघितलेलं आहे आणि आजही बघत आहेत, निश्चितपणे लोक त्यांना योग्य उत्तर देतील.”

जितेंद्र आव्हाडांनी काय विधान केले?

जितेंद्र आव्हाड यांनी आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा असा हॅशटॅग देत चार ओळींचे एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी प्रभु राम, रावण, छत्रपती शिवाजी महाराज, मुघल, आदिलशाही अशा सर्वांचा उल्लेख केला आहे. “रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्ण-अर्जुन समजावून सांगा. आदिलशाही आणि मुघल बाजूला काढून श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वातंत्र्यलढा समजावून सांगा,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

Dnyaneshwar: