मुंबई : (Sanjay Raut On BJP Leader) सध्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडकांमुळे राजकिय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधीपक्ष भाजप यांच्यात एकमेकांवर टिका, आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यातच आता भाजपकडून (BJP) शिवसेनेला (Shivsena) डिवडण्यात आले आहे. बाळासाहेब (Balasaheb Thackeray) असते तर, हे सरकार बनवलं नसतं. बाळासाहेबांनी अशा खुर्चीला लाथ घातली असती, असा दावा भाजप नेत्यांकडून केला.
त्याबाबत पत्रकांरानी शिवसेना संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रश्न केला असता, त्यांनी मोठा दावा केला आहे. हे सरकार बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार आहे. ही त्यांचीच भूमिका असल्याचे राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, भाजप नेत्यांनी केलेल्या टिकेवर, राऊत म्हणाले अजिबात नाही. अनेकदा बाळासाहेब आणि शरद पवार (Sharad Pawar) स्टेजवर एकत्र आले आहेत. इतकंच नाही तर, बाळासाहेब म्हणाले होते की, दोन्ही पक्ष एकत्र आले तर, आपण दिल्लीला झुकवू. त्यामुळं आता जे सरकार स्थापन झाले आहे ते बाळासाहेबांचे स्वप्न होत. आता जे कोणी गैरसमज निर्माण करत आहेत, त्यांना शिवसेनेचे विचार आणखी समजले नाहीत असे राऊत म्हणाले.