राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचे प्रकरण! राज्य सरकारला बाजू मांडण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई : (Governor appointed 12 MLAs Case) राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण मागच्या तीन वर्षांपासून खितपत पडलेलं आहे. या प्रकरणी आज पुन्हा मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आपली भुमिका 21 तारखेला स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. संपूर्ण प्रकरणाची सुनावणी ही 21 ऑगस्ट रोजी पार पडेल.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जून २०२० मध्ये दिलेली 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर सर्वप्रथम निर्णय व्हावा. त्यानंतर आलेल्या यादीचा विचार केला जावा,असं याचिकाकर्ते सुनिल मोदी यांनी म्हंटलं आहे. तेव्हापासून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचं प्रकरण भिजत पडलं आहे.

या प्रकरणातील मुख्य याचिकाकर्ते रतन सोली यांना याचिका मागे घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मुभा दिलेली होती. तर दुसरे याचिकाकर्ते सुनिल मोदी यांना हायकोर्टात पुन्हा दाद मागयची असेल तर मागा, असं कोर्टाने म्हटलं होतं. त्यानुसार आता सुनिल मोदी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे येत्या 21 ऑगस्ट रोजी काय निकाल येतो हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Prakash Harale: