कोश्यारींचा महाराष्ट्राला अखेरचा राम राम; निरोप देतेवेळी मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री राजभवनात उपस्थित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे निरोप भेट घेतली.

राजभवनात आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निरोप देण्यात आला. यावेळी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजशिष्टाचार विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर तसेच राजभवनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमांना स्वतः उपस्थित राहिलेले राज्यपाल अशीही त्यांची ओळख महाराष्ट्राला कायमच राहील. त्यांनी राज्य सरकारला केलेले सहकार्य आणि महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान विसरता येणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्रतील महापुरूषांच्यावर अपमानजनक वक्तव्य केल्याने ते कायम चर्चेत राहिले.

Dnyaneshwar: