डिस्चार्ज मिळताच राज्यपाल कोश्यारी ॲक्शन मोडमध्ये; थेट गृह खात्याला पत्र!

मुंबई : (Governor Koshyari Letter on DGP And Mumbai Commissioner) बंडखोर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन सेनेविरोधात बंड पुकारले. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. सध्या स्थितीला महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुवाहाटी येथे गेलेल्या सर्व आमदारांच्या कुटुंबियांचे महाराष्ट्र सरकारचे असलेले संरक्षण काढून घेतले आहे.

दरम्यान, त्यानंतर केंद्र सरकारनं या फुटीर आमदारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रापाठोपाठ यात आता कोरोनातून डिस्चार्ज मिळालेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उडी घेतली आहे. ते अॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी मुंबईचे डीजीपी आणि पोलिस आयुक्तांना पत्र लिहलं आहे. राज्य सरकारमध्ये हस्तक्षेप करायला त्यांनी सुरुवात केली आहे. शिंदे गटातील आमदारांना आजच सुरक्षा द्या, अशा आशयाचे हे पत्र आहे.

शिंदे गटातील आमदारांना आजच सुरक्षा द्या, असे पत्रात राज्यपाल कोश्यारी यांनी गृह खात्याला म्हटले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. या पत्राची एक कॉपी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे आणि महाराष्ट्राचे डीजीपी यांना पाठवण्यात आले आहे. गुवाहाटी येथे असणाऱ्या सर्व आमदारांना सुरक्षतितेची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याची माहिती मिळली आहे.

Prakash Harale: