ग्रामपंचायत निवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावल्या! रविवारी होणार मतदान, मंगळावारी निकाल…

बीड : (Gram Panchayat election campaign) महाराष्ट्रात सध्या विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचार तोफा आज थंडावल्या असून, रविवारी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचं लक्ष आहे. या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबर रोजी लागणार आहे. गावगाड्यात गेल्या काही दिवसांपासून मतदारांची प्रत्यक्ष भेट होत नसेल तर फोन, मेसेजद्वारे मतदारापर्यंत जाहिरनामे, आणि पॅनलच्या भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी सोशल मीडिया सध्या प्रभावीपणे वापर प्रचारात करण्यात आला आहे.

दुसरीकडे, पंचायतींमध्ये 50 टक्के महिलाराज असल्याने प्रचारामध्ये प्रत्येक गावात महिलांचा सुद्धा मोठा सहभाग दिसून आला. बीड जिल्ह्यात एकूण 704 ग्रामपंचायतींपैकी 34 ग्रामपंचायती या बिनविरोध निवडून देण्यात आला. त्यामुळे उर्वरित 670 ग्रामपंचायतीसाठी येत्या रविवारी 18 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

670 सरपंच पदासाठी जिल्ह्यात 1 हजार 932 उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर ग्राम पंचायत सदस्यपदासाठी 2 हजार 107 जागांसाठी 12 हजार 219 उमेदवार मैदानात आहेत. जिल्ह्यात 185 मतदान केंद्रे संवेदनशील असून अन्य काही केंद्र अतिसंवेदनशील आहेत. अशा ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

Prakash Harale: