‘इंटरनॅशनल एक्स्पो’चे पुण्यात शानदार उद्घाटन

शिल्पकार व चित्रकार सहभागी

पुणे : वॉटरकलर, म्युरल, चारकोल, ग्लासपेंटिंग, पोर्ट्रेट, पोस्टर कलर, ऑइल कलर, सिरॅमिक, अ‍ॅक्रॅलिक, स्क्लपचर, कॅलिग्राफी अशा विविध प्रकारच्या आधुनिक व पारंपरिक चित्र, शिल्पांचा मेळ असलेल्या ‘इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो पुणे’ या वैविध्यपूर्ण चित्र-शिल्प प्रदर्शनाचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. येत्या रविवारपर्यंत पुणेकरांना या प्रदर्शनाची पर्वणी अनुभवता येणार आहे.

आर्टक्यूब गॅलेरिया पुणेच्या वतीने ‘इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो पुणे’चे आज मिस इंडिया रनरअप सोनाली काकडे व दिवा पीजेन्ट्स मॉडेल ग्रुमिंगचे कार्ल मासकेरन्स यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार उमाकांत कानडे, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सच्या विभागप्रमुख अनुपमा पाटील, चित्रकार चारुहास पंडित, आर्टक्यूब गॅलेरियाचे अतुल काटकर, प्रमोद माने, कॅमलचे झोनल बिजनेस मॅनेजर नंदकुमार गायकवाड, ग्राफीनेट सोल्युशनचे चेतन मोरे, एमआयटी स्कूल ऑफ डिझाइनच्या एचओडी श्रुती निगुडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या इंटरनॅशनल आर्ट एक्स्पोमध्ये जवळपास ४०० चित्रकार सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रासह कलकत्ता, चेन्नई, चंदिगड, मेरठ, गुजरात, वेस्ट बंगाल तसेच सिंगापूर आणि दुबई येथूनही कलाकार आपली कला येथे सादर करीत आहेत.

Dnyaneshwar: