गांधीनगर | Gujarat Election Result 2022 – आज (8 डिसेंबर) गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये भाजपच्या 25 वर्षाच्या सत्तेला आप पक्षाकडून सुरूंग लावणार असं वातावरण निर्माण केलं होतं. मात्र, प्रत्यक्षात निकाल हाती आल्यावर काँग्रेस आणि ‘आप’च्या पदरात काही पडलेलं पहायला मिळत नाही. तर भाजपने पुन्हा एकदा आपली सत्ता राखत जोरदार मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे.
एक्झिट पोलनुसार, पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या भाजपच्या हाती येतील असं दिसत आहे. भाजप आपला 2002 मधील 227 जागांचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेसचा 1985 मधील 149 जागांचा रेकॉर्ड मोडणं त्यांना शक्य होणार नाही.
एक्झिट पोलनुसार भाजपला 182 जागांपैकी 117 ते 151 जागा आणि काँग्रेससह त्याच्या मित्रपक्षांना 16 ते 51 जागा मिळतील, असा अंदाज आहे. ‘आप’ला मात्र तीन ते 13 जागांवर समाधान मानावं लागेल, असे अंदाज आहेत.
View Comments (0)