जळगाव : (Gulabrao Patil On Devendra Fadnavis) आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या मध्ये सुरु असलेल्या वादात मंत्री गुलाबराव पाटील यांनी बच्चू कडू यांची बाजू घेतली असून , तुमच्या वादात सगळ्यांना बदनाम करु नका, रवी राणा यांनी आपले शब्द मागे घ्यावे, नाही तर ती गोष्ट चुकीची होईल लोकांमध्ये संभ्रण निर्माण होईल, हा एकट्या बच्चू कडू यांच्यापुरता मर्यादित नसून तो 40 आमदारांवर होणारा आरोप आहे, त्यामुळे फडणवीसांनी राणांना वेळीच समज द्यावा, अशा प्रकारची भूमिका गुलाबरावांनी घेतल्यामुळे बच्चू कडू यांना बळ मिळाले आहे.
दरम्यान, अमरावतीमध्ये दोन अपक्ष आमदारांमध्ये रंगणार वाद हा राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा विषय होताना दिसत आहे. सरकारमधील भाजप समर्थक बडनेरा मतदारसंघाचे आमदार रावी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी अचलपूरचे शिंदे समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर एक नाही दोन नाही तर तीन वेळा तोडपाण आणि विकावू आमदार म्हणून टिका केली होती, तर पन्नास खोके घेऊन मी काय गुवाहाटीला गेलेला आमदार नाही, अशी भर सभेत टिप्पणी केली होती.
त्यामुळे ऐन दिवाळीच्या सणात या दोन सरकार समर्थक आमदारांमध्ये शिवमा पाहायला मिळाला. पैसे घेऊन बच्चू कडूंनी सरकारला पाठिंबा दिल्याचा आरोप रवी राणा यांनी केल्यानंतर बच्चू कडूंनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, एक तारखेचा अल्टिमेटमही त्यांनी दिला आहे. या काळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, नाही तर आम्ही रितसर रवी राणा यांच्यावर तक्रार करणार आहोत असं बच्चू कडू म्हणाले आहेत.