“…तर आज राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत दिसली असती, शिंदे गटाचा मोठा गौप्यस्फोट

जळगाव : (Gulabrao Patil On Jayant Patil) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता, तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसच भाजपसोबत सत्तेत दिसली असती, असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटाचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटीलांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, शनिवार दि. 05 रोजी शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार शिर्डी येथील अधिवेशनानंतर कोसळेल, असे भाकीत केले आहे. यावर गुलाबराव पाटील म्हणाले, आता शिबिर संपले आहे त्यामुळे आपण सरकार पडण्याची वाट पाहत आहोत. आपले आमदार आपल्यासोबत कायम राहावे म्हणून त्यांना असे बोलावे लागते. आमचे सरकार पडणार नाही, ते भक्कम आहे. दोन वर्षाचा कार्यकाळ आमचे सरकार पूर्ण करेल, असा दावाही गुलाबराव यांनी केला केला.

भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेसने पहाटे कोंबडा आरविण्यापूर्वीच सत्तेत मंत्रिपदाची शपथ घेतली होती. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता, तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबतच गेली असती, असा दावाही त्यांनी केला.

Prakash Harale: