सातारा : शरद पवार यांच्या घरावर हल्ल्या झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. त्यातच साताऱ्यातील छत्रपती महाराज घराण्यावर टीका केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर आनखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आज सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांना हजर करण्यात आले आहे. यादरम्यान त्यांना चार दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. न्यायालयाने पुढील तपासासाठी ही कोठडी दिल्याचे वकील सतिष सुर्यवंशी, वकिल प्रदीप डोरे यांनी सांगितले आहे. त्यांच्याकडून सदावर्तेंची बाजू मांडली आहे.
सदावर्ते यांना कोठडी वाढवून मिळावी म्हणून मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी गुरुवारी सदावर्ते यांच्या विरोधात सातारा पोलिस ठाणे येथे घोषणाबाजी केल्याने आज न्यायालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काल सातारा पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना ऑर्थररोड तुरुंगातून सातारा न्यायालयात हजर केले. या सुनावणी दरम्यान, सरकारी वकील यांनी सदावर्ते यांना पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केली आहे. सदावर्ते यांच्या भाषणामुळे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ॲाक्टोबर २०२० मध्ये सातारा शहर पोलिस ठाण्यात मराठा आरक्षणाप्रकरणी एका वृत्तवाहिनीवरती आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबच्या गुन्ह्यात गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पाोलिसांनी गुरुवारी मुंबईतून ताब्यात घेतलं आहे. छत्रपती घराण्या वर टीका केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.