पंचायत समिती कार्यालयावर हांडा मोर्चा, महिलांचे ठिय्या आंदोलन

Nashik | चांदवड (Chandvad) तालुक्यातील उसवाड येथील ग्रामपंचायत मार्फत वॅाटर सप्लाय पाणीपुरवठा विहिरीतील विद्युत मोटर सात महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना चालू करून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा मिळण्याकरता ग्रामसेवक ग्रामपंचायत यांना वारंवार सांगून देखील प्रश्न सुटत नसल्याने महिलांनी चांदवड पंचायत समितीवर थेट पिण्याच्या पाण्यासाठी हांडा मोर्चा आंदोलन केले आहे.

विहिरीला आता सध्या पाणी असून देखील तेथील पाणी पिण्यास नागरिकांना मिळत नसल्यामुळे महिलांनी ग्रामसभा घेण्यासाठी 2 ऑक्टोबर रोजी सभा आयोजित केली. मात्र या ग्रामसभेला ग्रामसेवक हजर नसल्याकारणाने शेवटी महिलांना पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागत आहे. महिलांची पाण्यासाठी होणारी फरपट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन तात्काळ सोडावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.

Sumitra nalawade: