काही माणसं ही आपल्या जाती धर्मा च्या गट समूहाच्या नेते पदावरून ओळखले जातात तर काहीजण शह करतो त्यावर चमकतात. पण अनेकदा काही विशिष्ट जाती-धर्म घटक समूहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कर्तुत्व अनेकदा त्या संकुचित जात विचाराच्या देखील पलीकडचे असते. अशावेळी त्याच्याकरिता जात ही अडसर ठरत नाही. ती कुठलीही मर्यादा ठरत नाही, तर त्यांचे नेतृत्व आणि लीडरशीप ही एका सर्व धर्म समानतेचे प्रतिक होऊन जाते.
पुण्यातील मंडईतील राजकारण समाजकारणाचे बाळकडू मिळालेले अॅड. मंदार जोशी हे असेच एक अद्वितीय व्यक्तिमत्व. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य असले आणि ब्राह्मण घराण्यात जन्म घेऊन देखील दलितांसाठी संघटनात्मक कार्य करीत असले तरी देखील कुठलाही जात आणि धर्म त्यांना मर्यादित ठेवू शकत नाही. ते कधी कर्वे शिक्षण संस्थेच्या उद्धारासाठी काम करतात तर कधी मिसळ पार्टी आयोजित करून सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ नवीन नवीन कार्यक्रम उपक्रम करताना दिसतात. कधी बुक फेअरमध्ये सहभागी होत पुण्याच्या बुद्धिवंतांसाठी झटताना दिसतात, तर कधी भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावरून नरेंद्र मोदी यांच्या विचाराचे पुरस्कर्ते म्हणून पुढे येतात. एक बहु आयामी बहु डंगी बहुरंगी असे व्यक्तिमत्व कसे असू शकते याचे उत्तम उदाहरण अॅड. मंदार जोशी हे आहेत.
मंदार जोशी ही मूळतः वकिली पेशाचे. त्यांची पत्नी अॅड. अर्चना जोशी यांचे त्यांना व्यावसायिक आणि संसारिक साथसंगत आहे. त्या देखील १२ असोसिएशनच्या माध्यमातून समाजकार्यामध्ये तत्पर आहेत. त्यांनी केलेले महिलांचे अपार संघटन कौतुकास्पद आहेच, परंतु त्यामागे ऍड. मंदार जोशी यांची प्रेरणा देखील मोठी आहे. संपूर्ण पुण्याच्या बार कौन्सिलमध्ये, वकिलांमध्ये संघटनात्मक काम करून या पेशाला एक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात ऍड.जोशी यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.
हा व्यवसाय सांभाळत असताना अनेक कंत्राटदार बांधकाम विषयक संस्था उद्योजक यांना कायदेशीर सल्लागार म्हणून नेमके मार्गदर्शन करण्यात देखील त्यांनी हिरीरीने पुढाकार घेतला. हे करत असताना रामदास आठवले यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मधील ब्राह्मणात्व जपलं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही केवळ दलिताची एक चळवळ जरी असली तरी ती सर्वधर्म समानतेचे प्रतिनिधित्व करणारी एक चळवळ आहे, हे अॅड. मंदार जोशी यांच्यासारख्या अनेक पदाधिकाऱ्यांमुळे दिसून आले. किंबहुना जोशी यांनी आरपीआयला ही एक वेगळी ओळख प्राप्त करून दिली. त्यांच्यानंतर अनेक ब्राह्मण पदाधिकारी आरपीआयमध्ये आले. रामदास आठवले यांची अॅड. मंदार जोशी यांच्यावरती विशेष मर्जी आहे. चित्रपट कलाकारांचे संघटन, अखिल भारतीय नाट्य आणि सिने संस्थांचे पदाधिकारी म्हणून देखील त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देत असताना अशा विविधरंगी व्यक्तिमत्त्वाचे रंग अधिक खुलो आणि त्यांच्या नेतृत्वाला आकाशाची भव्यता लाभो ही सदिच्छा !