Hardik Pandya injury : बांगलादेशविरोधातील सामन्यात हार्दिक पांड्याचा पाय मुरगळला असून जखमी झाला आहे. यावेळी कदाचित त्याला इंजेक्शनही दिलं जाऊ शकतं. हार्दिक पांड्या इग्लंडविरोधात सामन्यात लखनऊमध्ये भारतीय संघात पुन्हा सामील होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने इंग्लंडमधील तज्ज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत केली असून त्यांचंही हेच मत आहे. पुढील सामन्यात हार्दिक खेळू शकणार नाही,” असं बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
हार्दिक पांड्या आपल्या उजव्या पायावर खाली आदळला आणि घोट्याला दुखापत झाली. दुखापत झाल्याने हार्दिक पांड्या मैदानातच खाली बसला होता. हार्दिक पांड्याला प्रचंड वेदना होत असल्याने फिजिओने मैदानात धाव घेतली. दरम्यान, हार्दिक पांड्या पुन्हा मैदानात खेळण्यासाठी उभा राहील असं वाटलं होतं. पण हार्दिक पांड्याला व्यवस्थित पळण्यास जमत नव्हतं. यानंतर संघ व्यवस्थापनाने त्याला मैदानातून बाहेर बोलावलं.
सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्याच्या दुखापतीवर बोलताना रोहित शर्माने सांगितलं होतं की, “त्याला थोडी दुखापत झाली आहे. पण दुखापत जास्त गंभीर नाही ही दिलासा देणारी बाब आहे. पण अशी दुखापत असेल तर तुम्हाला रोज आढावा घेण्याची गरज असून, आम्ही गरज असणारी प्रत्येक गोष्ट करत आहोत. न्यूझीलंडविरोधातील सामना मोठा असणार आहे. संघातील प्रत्येकाला दडपणाखाली खेळण्याची सवय आहे. प्रेक्षक मोठ्या प्रमाणात येत आहेत. आमच्यासाठी ही विशेष बाब आहे. प्रेक्षकांना आम्ही नाराज केलेलं नाही आणि यापुढेही मोठी कामगिरी करु अशी अपेक्षा आहे”, असं रोहित म्हणाला.