Natasa Hardik Wedding : व्हॅलेंटाइन डेला हार्दिक पांड्या पुन्हा बोहल्यावर चढला, फोटो आले समोर

Natasa Hardik Wedding : टीम इंडियाचा खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविच (Natasa Stankovic) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्न केल्याची माहिती दिली होती. नताशा प्रेग्नंट असल्यामुळे त्यांनी कोर्टात लग्न केल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर आता नताशा आणि हार्दिकने थाटामाटात उदयपूर येथे लग्न केले आहे. त्यांच्या लग्नातील फोटो समोर आला आहे. या दोघांनी त्यांच्या दुसऱ्या लग्नातील व्हाईट आणि ब्लॅक आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत. नताशाने पांढऱ्या रंगाचा गाऊन आणि हार्दिकने काळ्या रंगाच्या सूटमध्ये खास फोटोशूट केलं आहे. या दोघांच्या फोटोला सोशल मीडियावर मोठी पसंती मिळत असून अनेकांनी त्यांना या दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

क्रिकेटर हार्दिक पांड्याने पत्नी नताशासोबतचे लग्नाचे फोटो शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलंय, ‘आम्ही तीन वर्षांपूर्वी घेतलेली शपथ पुन्हा एकदा व्हॅलेंटाईन डेला घेत हा दिवस साजरा केला. आमचं प्रेम, आमचा खास दिवस साजरा करण्यासाठी आमचे कुटुंबीय, मित्र आमच्यासोबत आहेत, याचा आनंद आहे’ अशा आशयाची खास पोस्ट त्याने लिहिली आहे.

Dnyaneshwar: