भारताला दुखपतीचं ग्रहण! अष्टपैलू खेळाडू पांड्या मैदानाबारहेर; रोहितचं टेन्शन वाढल..

पुणे : (Hardik Pandya, World Cup 2023) भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यामध्ये पुण्यात सामना सुरु आहे. पण या सामन्यादरम्यान भारताला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला दुखापत झाली आहे. गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी मैदानावर येत हार्दिक पांड्यावर उपचार केले. पण हार्दिकला आराम मिळाला नाही. तो पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी तयार झाला, पण दुखापत बळावली. त्यामुळे हार्दिक पांड्याला मैदान साडून परत तंबूत जावे लागले.

हार्दिक पांड्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप कोणताही अपडेट आलेली नाही. हार्दिक पांड्यामुळे भारतीय संघ संतुलीत होतो. गोलंदाजीसोबत हार्दिक फलंदाजीही करतो. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत आता सर्व मदार शार्दूल ठाकूर याच्यावर असेल.

आठ षटकांपर्यंत जसप्रीत बुमारह आणि मोहम्मद सिराज यांनी बांगलादेशच्या सलामी फलंदाजांना हात उघडून दिले नव्हते. नववे षटक टाकण्यासाठी हार्दिक पांड्या आला. पहिला चेंडू निर्धाव फेकला. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार गेला. तिसरा चेंडू फेकल्यानंतर हार्दिक पांड्याला दुखापत झाली. हार्दिक पांड्या चेंडू अडवण्यासाठी गेला, पण त्याचवेळी त्याच्या पायाला दुखापत झाली. त्याला प्रचंड वेदना होत होत्या. फिजिओ तात्काळ मैदानात आले. त्यांनी उपचार केले.

हार्दिक पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी गेला. पण त्याची वेदना वाढली. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. हार्दिक पांड्याच्या षटकातील तीन चेंडू टाकण्यासाठी विराट कोहली आला. विराट कोहलीने सहा वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली. विराट कोहलीने तीन चेंडूमध्ये दोन धावा दिल्या.

Prakash Harale: