उत्तराखंड : उत्तराखंडमधील कुमाऊँची प्रतिष्ठित धार्मिक संस्था शरणम् जन ही कुमाऊंच्या प्रतिष्ठित धार्मिक आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेणारी संस्था असून, यावर्षी नोव्हेंबरमध्ये गरीब मुलींचा लग्नसोहळा आयोजित करणार आहेत. हरी शरणम् जनप्रमुख स्वामी रामगोविंद दास भाईजी यांच्या पुढाकारानंतर १११ गरीब मुलींच्या लग्नाची भव्य तयारीही सुरू झाली आहे.
हरी शरणम् जनप्रमुख स्वामी रामगोविंद दास भाईजी यांनी सांगितले की, गरीब मुलींचे विवाह १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून केले जातील.
गरीब मुलींचा लग्नसोहळा
गेली अनेक वर्षे सामाजिक, आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यासाठी वाहून घेतलेल्या शरणम् जन या धार्मिक संस्थेचे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. या संस्थेच्या माध्यमातून केवळ १११ मुलींचे लग्नच लावून दिले जात नाही, तर नवविवाहित जोडप्यांना नवीन घर सुरू करण्यासाठी लागणाऱ्या अनेक महत्त्वाच्या तसेच गृहोपयोगी वस्तू देखील दिल्या जाणार आहेत.
शहराच्या मध्यभागी असलेल्या एमबी इंटर कॉलेजच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार असून, अत्यंत गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी हा पुढाकार घेतला जात आहे. आपल्या आजूबाजूला असे गरीब लोक असतील तर त्यांनी ९८३७० ५३४३६ या क्रमांकावर नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी शहरातील जनतेला केले आहे. लग्नात होणारा खर्च पूर्णपणे मोफत असेल आणि लग्न पूर्ण रीतीरिवाजाने पार पडेल, असेही त्यांनी सांगितले. ज्या लोकांचे लग्न होणार आहे त्यांचे लग्न कुटुंबाने आधीच ठरवले पाहिजे आणि लग्नासाठी कुटुंबातील सदस्यांची पूर्ण संमती असावी. नवविवाहित जोडप्यांना नवीन घर सुरू करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या, तसेच गृहोपयोगी वस्तू त्यांना दिल्या जाणार आहेत. यापूर्वी १३ ते १९ नोव्हेंबर दरम्यान एमबी इंटर कॉलेज मैदानावर दुपारी २ ते ६ या वेळेत श्रीमद भागवत कथेचेही आयोजन करण्यात आले आहे. पूज्य गौरव कृष्ण गोस्वामी कथा वाचन करणार आहेत.