Haris Rauf Pakistan Vs Australia : भारतात सुरू असलेल्या वर्ल्डकप 2023 मध्ये भारताकडून पराभूत झाल्यापासून पाकिस्तानचे सगळे ग्रह फिरले आहेत. पाकिस्तान आज आपला चौथा सामना ऑस्ट्रेलिया सोबत खेळत आहे.
विराटचं आयपीएलमधील होम ग्राऊंड बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम हा सामना होत असल्याने धावांचा पाऊस पडणार हे ठरलेलंच होतं. तरीसुद्धा पाकिस्तानची जगविख्यात वेगवान गोलंदाजी थोडीफार तरी दर्जा दाखवले असे वाटत होते.
मात्र ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनीच पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. डेव्हिड वॉर्नर आणि शॉन मार्श यांनी तब्बल 259 धावांची सलामी दिली. पाकिस्तानचा सर्वात वेगवान गोलंदाज हारिस राऊफच्या तर चिंधड्या उडाल्या. पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज असलेल्या हारिस राऊफचा 4 षटकातच बाजार उठला.
त्याने 4 षटकात 59 धावा दिल्या. त्याची इकॉनॉमी 14.80 इतकी खराब राहिली. विशेष म्हणजे हारिस राऊफची यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अत्यंत सुमार कामगिरी झाली आहे. त्याने या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 9 षटके टाकली. त्यात एकही विकेट न मिळवता 90 धावा दिल्या. भारताविरूद्धच्या सामन्यात त्याला 6 षटकात 43 धावा झाल्या तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याच्या गोलंदाजीवर 4 षटकात 59 धावा झाल्या आहेत.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अन् इथंच माशी शिंकली. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांंना सळो की पळो करून सोडलं. या दोघांनी 33.5 षटकात 259 धावांची खणखणीत सलामी दिली.
अखेर शाहीन आफ्रिदीने मिचेल मार्शची 121 धावांची खेळी संपवली. पाठोपाठ ग्लेन मॅक्सवेलचा देखील अडसर दूर केला. तो पुढच्याच चेंडूवर शुन्य धावांवर बाद झाला. मात्र डेव्हिड वॉर्नरने काही पाकिस्तानच्या गोलंदाजांना सुट्टी दिली नाही. त्याने 124 चेंडूत 163 धावांची दीडशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला 325 धावांपर्यंत पोहचवले. अखेर राऊफनेच डेव्हिड वॉर्नर नावाचे वादळ शांत केले. स्मिथ देखील 7 धावा करून उसमा मीरची शिकार झाला.