हर्ष गोएंकांनी शेअर केलेली ही नोकरीची जहिरात पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Viral Advertisment | सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका नोकरीच्या जहिरातीची चर्चा सर्वत्र आहे. देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोएंका यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही जहिरात शेअर केली आहे. पण ही जहिरात गोएंका यांनी दिली नसून त्यांना ती जहिरात आवडल्यामुळे त्यांनी ती शेअर केली आहे.

नोकरीची ही अनोखी जाहिरात पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. गुजरातमधील नवसारी येथील भक्ताश्रम शाळेने काढलेली ही जाहिरात गणित विषयाच्या शिक्षकांसाठी आहे. या नोकरीच्या जाहिरातीत गणिताचा एक गुंतागुंतीचा प्रश्न देण्यात आला आहे, तो सोडवल्यावर एक मोबाईल नंबर मिळेल आणि मग गणित शिक्षकाच्या नोकरीसाठी त्याच नंबरवर कॉल करावा लागेल. गणित शिक्षक म्हणून नोकरी करायची असेल तर या प्रश्नाचं उत्तर मिळायलाच हवं.

या पोस्टखाली युजर्सने मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी प्रश्नाचे उत्तर शोधून कॉमेंट बॉक्स मोबाईल नंबर सुद्धा टाकला आहे.

Dnyaneshwar: