पुण्यात मुसळधार पाऊस, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे | Pune Rain Update – पुण्यात (Pune) काल (15 सप्टेंबर) रात्रीपासून मुसळधार पावसानं (Pune Rain) जोर धरला आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात देखील संततधार पाऊस पडत आहे. तसंच हवामान खात्याकडून दोन दिवस पुणे जिल्ह्यासह काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. ऑरेन्ज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला होता. त्यामुळे कालपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे.

शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने शहरात सर्वत्र हजेरी लावली आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस असला तरी संततधार पडणाऱ्या सरींनी पुणेकरांच्या अडचणीत वाढ केली आहे. तसंच पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. येत्या 3 ते 4 तासांमध्ये खडकवासला धरणामधून मुठा नदीपात्रामध्ये अंदाजे 22,000 ते 25,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जाण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, पुण्यासह मुंबई, पालघर, रायगड, नाशिक, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. तर येत्या तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Sumitra nalawade: