वंचितांची मदत हीच बांधिलकी

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे तत्त्व ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण आहे. समाजातील गरीब, गरजू व वंचितांना मदतीचा हात देणे. सामाजिक गरज ओळखून साहित्य वाटप करणे, हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सामाजिक बांधिलकी आहे, असे प्रतिपादन उद्योजक विलास काळोखे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्ताने आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने बुधवारी (दि. १५) विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी तळेगाव दाभाडे शहर अध्यक्ष गणेश काकडे, महिला अध्यक्ष शैलेजा काळोखे, उद्योजक विलास काळोखे, वरिष्ठ उपाध्यक्ष आशिष खांडगे, राष्ट्रवादी युवक तळेगाव दाभाडे अध्यक्ष करण शेळके, हर्षद पवार, विद्यार्थी अध्यक्ष पुष्पक दाभाडे, अर्चना दाभाडे, ओंकार जाधव, तुषार काळोखे, कैलास काळोखे, निनाद जोशी, गणेश निळकंठ, संदीप शेळके, राजीव फलके, नीलेश फलके, वेदांग जोशी, प्रकाश घुले बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळी ११ वाजल्यापासून तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक ६, नगरपरिषद प्राथमिक विद्यालय, लोकमान्य टिळक शाळा, कन्याशाळा आदी शाळांमध्ये शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले, तसेच यशवंतनगर गार्डन व राव कॉलनी गार्डन येथे फळझाडांचे रोपण करण्यात आले.

उद्योग धाम येथील विद्यार्थ्यांना १०० किलो खाद्यतेल व ५० किलो साखर व शालोपयोगी साहित्य व पावसाळ्यासाठी छत्री आदी साहित्याचे वाटप, टेल्को कॉलनी येथे आई तुळजाभवानी मंदिरात ५०० स्थानिक नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
तळेगाव दाभाडे शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश काकडे यांनी प्रास्ताविक केले. गणेश निळकंठ व स्वप्नील मावळकर यांनी सूत्रसंचालन केले. करण शेळके व हर्षद पवार यांनी आभार मानले.

Sumitra nalawade: