मुंबई | Hemangi Kavi Shared A Special Experience – मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी ही नेहमी सोशल मीडियावर बिनधास्त वक्तव्य करताना दिसते. तसंच ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता देखील हेमांगीने एक खास अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
हेमांगी आजवर भारतात तसेच भारताबाहेर अनेक मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन आली आहे. पण ताजमध्ये जाण्याची तिची कधीच हिंमत झाली नाही. तिथे चहाची किंमत किती आहे हे देखील तिने सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर ताजमधील स्वतःचे काही फोटो पोस्ट करत हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापासून ते तिथे आलेला अनुभव याचं वर्णन तिने केलं आहे. तिच्यासाठी हा अनुभव काही खास होता.
हेमांगीने ताज हाॅटेलमधील काही फोटो पोस्ट करत म्हटलं आहे की, “लहानपणापासून वाटायचं साला एकदा तरी ताज हॉटेलमध्ये जाऊन चहा पिऊन यायचंय यार…41 वर्ष मुंबईत राहून ही कधी ताज हॉटेलमध्ये जायची हिंमत नाही झाली. कारण इच्छा असली तरी आपण पडलो मध्यम वर्गीय आणि मध्यम वर्गीय माणसाला हिंमत गोळा करायला बराच काळ जावा लागतो. मी आजही मध्यम वर्गीयच आहे. घर, गाडी, घरात एसी, इमारतीला लिफ्ट, 24 तास पाणी, वीज, गाठीला थोडा पैसा ही सगळी साधनं. परिस्थिती आता सुधारली आहे बरं म्हणायला पुरेशी असली तरी मध्यम वर्गीय मानसिकता गळून पाडेल याची हमी देत नाहीत. पण वाढदिवसानिमित्त पहिल्यांदाच ताज हॉटेलमध्ये शिरले! बाहेरून complete उंची लोकांचा ‘पेहराव’ पण मनात middle class ‘इधर ही ठेहेर जाव’!