‘या’ दिवशी पुन्हा अनुभवायला मिळेल झिम्माची जादू; पोस्टर शेअर करत दिग्दर्शकाने दिली गुड न्यूज

मुंबई | नव्या वर्षात मराठी चित्रपटांची चांगलीच ओपनिंग झाली आहे. या वर्षात एक सो एक दमदार मराठी चित्रपट तयार होत आहेत. मागील वर्ष तर मराठी चित्रपटांनी गाजवलं होतं, असं म्हटलं तरी चालेल. आता नव्या वर्षात देखील दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘झिम्मा’ने एक वर्षापूर्वी बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या यशाने सगळीकडे आनंदी आनंद पसरला होता. ‘झिम्मा’ला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळाल होत. झिम्मा चित्रपटला प्रेक्षकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून चित्रपटचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. झिम्मा चित्रपटचे दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि त्यांची पत्नी आणि चित्रपटची निर्माती क्षिती जोग यांनी ‘झिम्मा 2’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘झिम्मा 2’ रिलीज होण्यापूर्वी दिग्दर्शकाने अजून एक मोठी घोषणा केली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित सुपरहिट ‘झिम्मा’चा आनंद पुन्हा एकदा महिलांना 3 मार्चपासून आठवडाभर अनुभवता येणार आहे. निमित्त आहे 8 मार्चचे म्हणजेच जागतिक महिला दिनाचे. याच खास दिनाचे औचित्य साधत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘झिम्मा’ पुन्हा एकदा चित्रपटगृहात झळकणार आहे.

क्षिती जोग आणि हेमंत ढोमे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘झिम्मा 2’ चित्रपटाची घोषणा केली होती. ‘चलचित्र कंपनी’ आणि ‘क्रेझी फ्यू फिल्म्स’ निर्मित ‘झिम्मा’ चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

Dnyaneshwar: