नवी दिल्ली | Nitin Gadkari – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी देशातील हिंदू मंदिरांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. देशातील हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छता नसते, अशी खंत नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं आहे.
यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, “मला वाटतं की, आपला देश असा आहे जिथे हिंदू समाजाच्या मंदिरांमध्ये स्वच्छता नाहीये. तिथे धर्मशाळाही चांगल्या नाहीयेत. परदेशात गेल्यानंतर तेथील गुरूद्वारा, चर्च, मशीद यांचं वातावरण पाहून मला वाटलं की आपलीही प्रार्थनास्थळे चांगली असावीत. जेव्हाही मला याबाबत काहीतरी करण्याची संधी मिळाली तेव्हा मी महाराष्ट्रात 12 हजार कोटी रूपयांचा पालखी मार्ग बांधला.”
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन गडकरींनी सांगितलं की, उत्तराखंडातील पिथौरागढ येथून निघणाऱ्या कैलास मानसरोवरच्या मार्गाचे 80 ते 85 टक्के काम पूर्ण झालं आहे. यापूर्वी नेपाळमधून जावं लागायचं यामुळे खूप त्रास व्हायचा.