मोदींपेक्षा त्यांच्या राष्ट्रविचारांचा पगडा मोठा

आ. चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने कर्मयोगी नमो लघुपट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शैलेश गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा घेण्यात आली होती. प्रमुख पाच उत्कृष्ट लघुपटांना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

पुणे : नरेंद्र मोदी हे व्यक्ती म्हणून महान आहेत, पण त्याहीपेक्षा एक राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी नेता म्हणून त्यांच्या विचारांवर जो पगडा आहे त्याचे कौतुक संपूर्ण जगभरात होत आहे. त्याचे प्रतिबिंब या लघुपट महोत्सवामध्ये येणार्‍या स्पर्धक लघुपटांमधून दिसून आले, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

भाजप सांस्कृतिक व शाळेच्या वतीने आयोजित केलेल्या कर्मयोगी नमो लघुपट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, प्रशांत दामले, मृणाल कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते वांगीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठचे शैलेश गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा घेण्यात आली होती. यासाठी सुमारे दोनशेहून अधिक लघुपट देशभरातून प्राप्त झाले होते. त्यातील प्रमुख पाच उत्कृष्ट लघुपटांना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. प्रथम लघुपटाला ७५ हजार रुपये, तर इतरांना पंचवीस हजार रुपयेपर्यंतची अनेक पारितोषिके व सन्मानपत्र देण्यात आले.

विक्रम गोखले यांनी यावेळी सांगितले की, राजकीय पक्षांचा विस्तार करणे ही त्या नेतृत्वाची गरज असते; परंतु जो पक्ष राष्ट्राभिमानाला आणि आपल्या मातीला महत्त्व देतो तो पक्ष त्या संपूर्ण भारताला पुढे नेणारा असेल. त्यामुळे अशा पक्षांवर प्रेम करणारा मी एक कलाकार आहे.

यावेळी बोलताना मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, ‘अनोख्या लघुपट संकल्पनेच्या माध्यमातून मला पुन्हा एकदा पुण्याशी जोडले जाण्याची संधी मिळत आहे. प्रशांत दामले यांनी सांगितले की, ‘कलाकार हा नेहमी कलाकार असतो. त्याला पक्षीय अभिनिवेश नसतो; परंतु तरीदेखील कलाकारांना राजाश्रय देणारा, त्यांना सन्मान देणारा पक्ष आणि त्यांची प्रवृत्ती कलाकारांच्या मनामध्ये घर करून राहते.

Prakash Harale: