पंतच्या नावावर होणार ऐतिहासिक विक्रम; रैनानंतर पंत दुसराच खेळाडू!

मुंबई – Rishabh Pant Special Record | दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. मात्र या मालिकेआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार के. एल. राहुल आणि फिरकीपटू कुलदीप यादव दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत.

के. एल. च्या दुखापतीमुळे संघाच्या कर्णधारपदाची धुरा ही युवा खेळाडू ऋषभ पंतवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पंतच्या नावावर एक खास विक्रम होणार आहे. टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणारा दुसरा सर्वात तरुण कर्णधार ठरणार आहे. सर्वात तरूण कर्णधार हा विक्रम माजी खेळाडू सुरेश रैनाच्या नावावर आहे.

दरम्यान, सुरेश रैनाने वयाच्या 23 वर्षे 197 दिवसांचा असताना कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. आता पंत  24 वर्षे 249 दिवसांचा आहे.

RashtraSanchar: