पुणे : आजच्या आणि येणाऱ्या पिढीला लालपरीचं महत्व माहित असणं खूपच गरजेचं आहे. त्यातही लालपरीच आणि पुणयाच एक आगळवेगळ नातही आहे. खरं तर या लालपरीचा जन्मच मुळातला पुण्याचा. म्हणूनच येणाऱ्या पिढीला एसटी चा इतिहास जाणून घेण्याबाबत एक वेगळीच उतसुकता आहे.
लाडक्या लालपरीचा जन्म हा स्वातंत्र्यपूर्व काळातला. १९३२ साली महाराष्ट्रात पहिल्यांदा प्रवासी वाहतुकीची सुरुवात खासगी प्रवासी व्यावसायिकांकडून करण्यात आली. पुढे आपला भारत देश १९४७ साली स्वतंत्र झाला. त्यानंतर मुंबई प्रांतामध्ये सार्वजनिक वाहतूक सुरु करण्यात आली. यासाठी १९४८ साली बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएसआरटीसी) या कंपनीची स्थापना करण्यात आली. १ जून १९४८ रोजी पहिली बस पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. स्वतंत्र भारताची ही पहिली बस. ही पहिली एसटी लाकडाची होती आणि एसटी चं छप्पर होतं कापडाचं. एकून ३० प्रवाशांची क्षमता असलेली ही एसटी रस्त्यावरुन दिमाखात धावायची. पण आता सांगून कुणाला खरं वाटणार नाही.
तुकाराम पांडुरंग पठारे हे पहिले ड्रायव्हर होते आणि लक्ष्मण कवटे यांना पहिले कंडक्टर होण्याचा मान मिळाला. त्याकाळी ड्रायव्हर म्हणजे चालक आणि कंडक्टर म्हणजे वाहक असे म्हटले जायचे. सुरवातीचया काळात गुजरात, मुंबई आणि महाराष्ट्र अशा प्रदेशाला बॉम्बे स्टेट म्हटलं गेल. आधुनिक निर्मितीनुसार १९६० साली महाराष्ट्राची स्थापना झाली. नंतर भाषावार प्रांत रचना झाली. या भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर महाराष्ट्र हे एक वेगळं राज्य म्हणून नावारुपाला आलं.
पूर्वी त्या त्या भागात वाहतूक सेवा सुरु झाली आणि बॉम्बे स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशन (बीएसआरटीसी) चं नावं बदलून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) असे करण्यात आले. पुढे या लालपरीचा अवाका वाढला आणि एमएसआरटीसी च्या माध्यमातून गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, गोवा अशा राज्यांमधल्या प्रवाशांच्या सेवेला देखील आपली एसटी तत्परतेने हजर राहू लागली.
आधुनिक काळात लालपरीचे स्वरुपही बदलले. १९८२ साली भारतात एशियाई गेम सपरधा मोठया परमाणात भरविलया गेलया. तयाचीच आठवण आणि समरण देशाला कायम सवरूपी रहावे महणूनच तयाकाळात पुणे – मुंबई हि एशियाड नावाने निमआराम बस उदयास आली. ती पुढे महाराष्ट्रात एशियाड नावाने खूप परसिदध झाली. आणि त्याचबरोबर एसी बससुद्धा सुरु झाली.
तुम्ही कधी लालपरीच्या एससी बसमध्ये बसला आहात का? प्रायव्हेट बसगाड्यांना टक्कर देण्याची क्षमता आपल्या लालपरीत आहे बरं का. हे विसरू नका. आज कर्मचारी संघटना आणि महामंडळ व्यवस्थापन यांच्यात एसटीकर्मचार्यांचे वेतन व सुविधा याबाबतीत सतत वाद होत राहिलेला आहे पण होणारी आंदोलने थांबली पाहीजेत.