बंगळुरु: कर्नाटकचे मुख्यंमत्री बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्री बसवराज यांनी फक्त नऊ महिने झाले पदभार स्वीकारला आहे. माजी मुख्यमंत्री बी. येडियुराप्पा यांच्या जागी त्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली होती. पण आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कर्नाटक दौऱ्यावर असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे .
तसंच येणाऱ्या काळात कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. अमित शाह यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याच नेतृत्वाखाली पुढील विधानसभा निवडणुका लढण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली असून राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची अपेक्षा पक्षाच्या काही नेत्यांनी व्यक्त केली आहे .तर या दौऱ्यात शाह भाजपच्या निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा घेणार आहेत. याचप्रमाणे अमित शहा यांनी येणाऱ्या २०२३च्या निवडणुकीसाठी कर्नाटक राज्यासाठी १५० जगाचं लक्ष ठेवलं आहे.
भाजपचे राज्य सचिव अरुण सिंग यांनी काल मुख्यमंत्री बदलणार असल्याच्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की,बोम्मई यांच्या पायउतारची कोणतीही शक्यता नाही. तेच मुख्यमंत्री पदावर कायम राहतील. गेल्या काही दिवसापूर्वी भाजप नेते आमदार बसवराज यत्नाळ-पाटील यांनी येत्या १० मे पूर्वी राज्यात फेरबदल शक्य आहे. नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे, असा दावा प्रसारमाध्यमापुढं केला होता म्हणून या चर्चांना उधाण आलं होतं. परंतु या संदर्भात अरुण सिंग यांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे.